न्यूयॉर्क : सिगारेटची सवय सोडण्यासाठी ई-सिगारेटचा सर्रास वापर केला जातो... पण, ई-सिगारेटचाही वापर तुमच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात झालाय.
ई-सिगारेटमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स तयार करण्यासाठी वापरात येणारे पदार्थ तुमच्या फुफ्फुसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर परिणाम करू शकतात. हे संशोधन करणाऱ्या संशोधनकर्त्यांनी १३ फ्लेवर्सचं परीक्षण केलं. त्यातील पाच फ्लेवर्सचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम दिसून आलाय.
या शोधाच्या मुख्य लेखिका अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या चेंपरेंस रोवेल यांच्या म्हणण्यानुसार, ई-सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामध्ये असलेली वेगवेगळी रसायनांचा फुफ्फुसांवर होणाऱ्या वाईट परिणामांबद्दल वापरकर्त्यांना माहितीच नसते.
यामध्ये ई-सिगारेटचा वापर किती प्रमाणात होतो, हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे. अध्ययनात कृत्रिम मानव फुफ्फुस ई-सिगारेटच्या १३ फ्लेवर्सच्या संपर्कोत जवळपास ३० मिनिटे किंवा २४ तासांपर्यंत ठेवण्यात आलं.
सुगंधित ई-सिगारेट दिसायला आणि वापरायला सोपे असले तरी त्यांच्याबद्दल वापरकर्त्यांना पूर्ण माहिती हवी. यामुळे, स्वास्थ्याला होणारा धोका आणि त्यांमागची कारणं यांचा प्रसार करणं खूपच गरजेचं आहे, असं रॉवेल यांचं म्हणणं आहे.
हे संशोधन डेनवरमध्ये झालेल्या अमेरिकन थोरासिक सोसायटी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.