वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे

महिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आणि त्या ते एंजॉयही करतात. 

Updated: May 18, 2015, 05:38 PM IST
वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे title=

न्यूयॉर्क: महिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आणि त्या ते एंजॉयही करतात. 

हे सर्व्हेक्षण न्यूयॉर्कच्या एका मार्केटिंग सेवा देणारी कंपनी 'लिप्पे टेलर'नं वेबसाइट 'healthywoman.org'च्या संयुक्त विद्यमाने केलंय. १८ वर्षांपासून वृद्धावस्थेतील १००० महिलांबाबत केल्या गेलेल्या या सर्व्हेक्षणात ५४ टक्के महिलांनी वाढत्या वयासोबत ते क्षण एंजॉय करण्याचा आनंद वाढतो असं सांगितलंय.

या सर्व्हेक्षणातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ४५ ते ५५ वर्ष वय असलेल्या महिला सेक्ससाठी अतिशय उत्सुक दिसल्या. मिलेनियम मेडिकल ग्रुपच्या नर्स प्रॅक्टिशनर नॅंसी बर्मन म्हणाल्या, 'महिलांचं वय जसजसं वाढत जातं तसतशी त्यांची नवरा किंवा पार्टनरसोबतची जवळीक वाढत जाते. त्यांना त्या क्षणांमध्ये अधिक मजा येते आणि त्या त्यावर लक्षही देतात.'

सर्व्हेक्षणात २८ टक्के महिलांनी स्वीकारलं की, त्या एका आठवड्यात दोन वेळा ते सात वेळा सेक्स करतात. 
लिप्पे टेलरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौरीन लिप्पे यांनी सांगितलं की, सर्व्हेक्षणनुसार या वयात महिलांना आपल्या जोडीदारासोबत घालवायला अधिक वेळ मिळतो. अशात त्यांना आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठीही 'त्या' काळाची गरज असते.

एजंसी इनपूटसह...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.