घरगुती उपायांनी पळवा घरातील ढेकूण, माशा, झुरळ आणि उंदीर

तुमच्या घरात घाण आणि आजार पसरविणाऱ्या जीवांनी थैमान घातले आहेत. या जीवांना पळविण्याची सहज पद्धत सूचत नाही तर आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

Updated: Aug 16, 2016, 10:38 PM IST
घरगुती उपायांनी पळवा घरातील ढेकूण, माशा, झुरळ आणि उंदीर  title=

मुंबई : तुमच्या घरात घाण आणि आजार पसरविणाऱ्या जीवांनी थैमान घातले आहेत. या जीवांना पळविण्याची सहज पद्धत सूचत नाही तर आम्ही तुम्हांला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

सर्वांत चांगली गोष्ट आहे की यामुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही. तसेच लहान मुलांसाठी हे उपाय खूप सुरक्षित आहेत. 

१. उंदरांपारून मुक्ती 
उंदरांना पेपरमिंटचा वास बिल्कूल पसंद नाही. घरात उंदीर थैमान घालत असतील तर कापसावर थोडे पेपरमिंट (अस्मंतारा) टाका, त्याने तेथे उंदीर येणार नाहीत, पळून जातील. या वासाने श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात. 

२. झुरळांपासून मुक्ती 
काळी मिरे, कांदे आणि लसूनची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. याचा वासाने झुरळ घर सोडून पळून जातील. 

३. घरमाशांपासून मुक्ती 
घरमाशांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो. असे असूनही घरमाशा घरात येतातच. त्यावर उपाय म्हणून कापसाच्या बोळ्याला एका उग्रवास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाज्याजवळ ठेवा. तेलाच्या वासाने घरमाशा दूर पळतात. हा उपाय करून पाहा माशा त्वरीत पळून जातील. 

४. ढेकूणला मारा 
कांद्याचा रस ढेकणाला मारण्यासाठी नैसर्गिक औषधी आहे. याच्या वासाने त्यांचे श्वास बंद होतो आणि ते त्वरित मरतात.