दररोज एक अंडे खा हृद्यरोगाचा धोका कमी करा

अंडे हे केवळ शरीरासाठी पौष्टिकच नव्हे तर हृद्यरोगासाठीही चांगले आहे. एका संशोधनामध्ये हे समोर आलेय. अधिक कोलेस्ट्रॉल युक्त भोजन अथवा नियमितपणे रोज एक अंड खाल्ल्यास हृद्यरोगाचा धोका कमी होतो. 

Updated: Feb 14, 2016, 12:26 PM IST
दररोज एक अंडे खा हृद्यरोगाचा धोका कमी करा title=

नवी दिल्ली : अंडे हे केवळ शरीरासाठी पौष्टिकच नव्हे तर हृद्यरोगासाठीही चांगले आहे. एका संशोधनामध्ये हे समोर आलेय. अधिक कोलेस्ट्रॉल युक्त भोजन अथवा नियमितपणे रोज एक अंड खाल्ल्यास हृद्यरोगाचा धोका कमी होतो. 

या संशोधनादरम्यान, ४२ ते ६० वयोगटातील एक हजार ३२ पुरुषांवर हा प्रयोग कऱण्यात आला. यांच्या दैनिक आहारत ५२० मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आणि एका अंड्याचा समावेश होता. या संशोधनानंतर वैज्ञानिकांना असे आढळले की उच्च कोलेस्ट्रॉल अथवा दररोज एक अंड्याचे सेवन याचा हृद्यरोगाशी काहीही संबंध नाही. 

अंडी केवळ शरीराला ताकदच देत नाहीत तर प्रोटीनचा स्त्रोत आहेत. त्यामुळे न्याहारीत अनेक जण अंड्याचा समावेश करतात.