close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीचे 5 उपाय

हल्ली महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. ब्रेस्टमध्ये एका विशिष्ट प्रकारची गाठ तयार होते. तसेच केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. कॅन्सर होणे पूर्णपणे रोखू शकत नाहीत मात्र काही उपायांनी कॅन्सरचा धोका कमी करु शकतो.

Updated: Oct 10, 2016, 04:29 PM IST
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीचे 5 उपाय

मुंबई : हल्ली महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. ब्रेस्टमध्ये एका विशिष्ट प्रकारची गाठ तयार होते. तसेच केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. कॅन्सर होणे पूर्णपणे रोखू शकत नाहीत मात्र काही उपायांनी कॅन्सरचा धोका कमी करु शकतो.

1. अल्कोहोलचे सेवन कमी केल्यास कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

2. नेहमी पोषक आहार तसेच आहारात भाज्यांचा पुरेसा वापर केल्यानेही कॅन्सरचा धोका कमी होतो.

3. नियमित व्यायाम शरीरासाठी उत्तम. नियमित व्यायाम केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.

4. स्तनपान करणाऱ्या महिलांमध्येही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी असते.

5. स्मोकिंगमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे स्मोकिंग बंद करणे कॅन्सर रोखण्यासाठीचा उत्तम उपाय.