लंडन : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या स्मृतीवर फारचं परिणाम होऊ लागला आहे. कधी कधी काही महत्वाच्या गोष्टीही स्मृतीभंशामुळे विसरून जातात.
गाढ झोप ही उत्तम बुद्धीची गुरूकिल्ली आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. गाढ झोप घेऊन उठल्यावर आपण अशा गोष्टी आठवू शकतो, ज्या आपण जागेपणीही कधी कधी आठवू शकत नाही.
ब्रिटनच्या एक्सीटर युनिवर्सिटीच्या अभ्यासाप्रमाणे गाढ झोपेमुळे, आपण फक्त आपली स्मृती सुरक्षित ठेवत नाही, तर खूप सहजपणे परत आठवूही शकतो.
पूर्ण झोप घेतल्यामुळे आपण आपल्या स्मृतीतील अनेक गोष्टी आठवू शकतो. तसेच गाढ झोप घेतल्यामुळे स्मृती कायम ठेवण्याची क्षमता मिळते असे एक्सीटर युनिवर्सिटीच्या निकोलसयांनी वक्तव्य केले आहे.
गाढ झोपेत खूप महत्वाच्या माहितीचा अभ्यास माणूस करत असतो. एका स्थितीत कोणती व्यक्ती १२ तास जागी राहत असेल, तर त्यामुळे कित्येक माहिती ती विसरून जाते. तसेच दुसऱ्या स्थितीत रात्रभर झोप घेऊन आपण अशी माहिती आठवू शकतो, जी जागेपणी आठवत नसतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.