रोज हळदीचे पाणी प्यायल्याचे ९ फायदे...

 हळद एके ठिकाणी खाण्याचा स्वाद वाढवते, रंग बदलते तसेच याचा उपयोग सौंदर्य वाढविण्यात आणि त्वचेच्या समस्येसाठी होतो. तसेच हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी होतो. 

Updated: Apr 4, 2016, 10:29 PM IST
रोज हळदीचे पाणी प्यायल्याचे ९ फायदे... title=

मुंबई :  हळद एके ठिकाणी खाण्याचा स्वाद वाढवते, रंग बदलते तसेच याचा उपयोग सौंदर्य वाढविण्यात आणि त्वचेच्या समस्येसाठी होतो. तसेच हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी होतो. 

निरोगी राहण्यासाठी आम्ही तुम्हांला हळदीचे असे उपयोग सांगणार आहे. जे तुम्हांला माहीत नसेल. 

१) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन असते. ते औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.

२) तुम्ही सकाळी  गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते. 

३) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात. 

४) अनेक रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते. 

५) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते. 

६) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते. 

७) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो. 

८) बायोकेमिस्‍ट्री आणि बायोफिजिकल रिसर्च नुसार हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप २ च्या डायबिटीजचा धोकाही टळतो. 

९) शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.