मुंबई : तुमची रोमान्टिक लाईफ नष्ट करण्यात तणावही कारणीभूत ठरू शकतो, याची तुम्हाला जाणीव आहे का? कदाचित असेलही पण हेच आता शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झालंय.
आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील आपला तणाव वाढविण्यास मदत करतात. कामाच्या ठिकाणचा तणाव, आर्थिक तणाव, स्वत:ला प्रचंड कामात गुंतवून घेणं आणि खास करून नात्यांचा ताण या गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर तर परिणाम होऊच शकतो परंतु, आपल्या रोमान्टिक लाईफलाही हा ताण नष्ट करू शकतो. तुमच्यातली कामवासना तणावामुळे नष्ट होऊ शकते, हे आता समोर आलंय.
तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या काही सोप्या टीप्स...
- एखादा प्रश्न हाताळताना तो कोणत्या पद्धतीनं तुम्ही हाताळता हे महत्वाचं आहे. तुम्ही परिस्थितीसमोर हार मानता की परिस्थितीला सामोरं जात त्याच्याशी दोन हात करता... यावरही बऱ्याचदा तुमची कामवासना अवलंबून असते.
- यासाठी तुम्ही, स्ट्रेस मॅनेजमेंट, मेडिटेशन, श्वासोच्छवासाच्या विविध टेक्निक्स वापरून तुम्ही तणावापासून स्वत:ला दूर ठेऊ शकता.
- स्वत:ला विविध गोष्टींत गुंतवून घेणं चांगलंच... पण त्याचा अतिरेक मात्र केव्हाही वाईटच... बऱ्याचदा महिला मात्र कुटुंब, घर, काम अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तारेवरची कसरत करताना दिसतात.
- यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या ठरवून घेऊ शकता. आपल्याला काय काय करायचंय याची एक यादी बनवा आणि मग कामांना योग्य पद्धतीनं हाताळून सुरूवात करा. यामुळे, तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटतील.
- नात्यांचा ताण तुमच्यासाठी खुपच कष्टदायक ठरत असेल तर वेळीच सावरा... आपल्या प्रियजनांशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करा. चांगले श्रोते बना... आणि आपल्या प्रियजनांना समजावून घेण्याचा प्रयत्न करा.