मुंबई : सेक्स संबंध जीवनातील खूप खास पैलूमधील एक आहे. वाढत्या वयानुसार सेक्स करण्याची क्षमचा आणि इच्छा कमी होणे स्वाभाविक आहे. पण असे काही टीप्स आहेत त्यामुळे तुम्ही नेहमी तरूण राहण्यास मदत होऊ शकते.
१) सेक्स पार्टनरशी उघडपणे बोला
पार्टनरसोबत समझदारीने आणि चर्चा करून सेक्स केल्यास हा सेक्स लाइफसाठी नव संजिवनीचे काम करते. वाढत्या वयानुसार तुमच्या शारीरिक क्षमतेत बदल होतो. बदललेल्या परिस्थिती स्वतःला मजबूत बनवून आपले धैर्य आणि समजदारीनुसार काही पाऊले उचलली पाहिजे. पार्टनरशी उघडपणे बोलल्यास भावनात्मक आकर्षण वाढेल आणि दोघांमध्ये कालानुरूप झालेल्या बदलानुसार स्वीकार्हता वाढेल.
२) आरोग्यप्रति जागरूक राहा
सामान्यपणे दुखणे आणि ब्लड प्रेशर तुमची सेक्स लाइफला प्रभावित होते. सतत योग, व्यायामामुले तुमच्या सेक्स लाइफवर पडणाऱ्या वाईट परिणामांना दूर ठेवले जाऊ शकते. असंतुलित पोषक तत्वाचे खानपान, स्मोकिंग करणे, अल्कोहोल जास्त पिणे, यानेही तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम पडू शकतो.
३) डॉक्टरांचा सल्ला घ्या
सेक्सबाबतीत डॉक्टर तोपर्यंत मदत करू शकत नाही जो पर्यंत तुम्ही उघडपणे डॉक्टरांना तुमची समस्या सांगत नाही. सेक्स संबंधी काही आजारांचे औषधं घेतली तर तुम्हांला काही साईट इफेक्टचा सामनाही करावा लागतो. पण, ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तरी तुम्हांला मदत होईल आणि सेक्स लाइफ पुन्हा सुरू करण्यास मदत होईल.
४) सेक्सचा प्रकार आणि काळानुसार प्रयोग
अनेक वेळा सेक्स करण्याचा प्रकार आणि काळानुसार प्रयोग केल्यास अनेक समस्या दूर होतात. तुमची तब्येत जर तुमच्या खासगी आयुष्यावर परिणाम करणारी असेल तर ती समस्या सकारात्मकपणे नोट करून त्याचे उत्तर शोधले पाहिजे. तसेच सेक्स करण्याचा प्रकार आणि विविध आसनांचा उपयोग केल्यास मदत मिळू शकते. विशेष म्हणजे काही व्यक्तींना आर्थरायटीस सारखे आजार आहेत, त्यांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
५) रोमान्सबद्दल विचार करा
कधी कधी रोमान्सबद्दल विचार करणेही खूप लाभदायक असते. पण असे कायम विचार करणे तुम्हांला महागात पडू शकते. वयानुसार तुम्हांला उत्तेजना प्राप्त करण्यासाठी काही शारीरिक अभ्यासाची गरज असते. चुंबन, आलिंगन अशा बहाण्याने आपल्या पार्टनरशी जवळ येणे, यामुळे प्रेम वाढते. एकटे असल्यास नियंत्रित हस्तमैथून करणे है चांगल्या सेक्स लाइफचा भाग आहे.