मुंबई : अॅसिडीटीमुळे त्रस्त असणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. मात्र बाजारात मिळणारी औषधं ताप्तुरता आराम देऊ शकतात.
बाजारातील औषधांचा कालांतराने साईड इफेक्ट संभवतो. पण ‘कोरफडी’चा रस हा घरगुती उपाय सुरक्षित आणि आरामदायी आहे.
अत्यंत फायदेशीर
पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी ‘कोरफड’ अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड रेचक असल्याने बद्धकोष्ठता, पोटातील अल्सर, जळजळ कमी होण्यास मदत होते.
कसा काढाल कोरफडचा गर
कोरफडीची पात कापून स्वच्छ धुवून घ्यावे. पात मधून कापून त्यातील गर काढून घ्यावा. हा गर धुवून त्यावरील पिवळा भाग काढून घ्यावा.
दोन चमचे कोरफडीचा गर ताकात मिसळून अंदाजे २० मिली मिश्रण बनवावे. योग्य मात्रेत हा गर घेणे आवश्यक आहे. हे पेय सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदा होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.