मुंबई : सिक्स पॅक बनवण्याची इच्छा प्रत्येक मुलाची असते. हे काही साधे काम नाही तर मात्र काही टिप्सचा वापर केल्यास तुम्ही सिक्स पॅक बनवू शकता. केवळ वर्कआउट करुन फायदा नाही तर डाएटवरही लक्ष ठेवणं गरजेचं असते. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दिवसातून तीन वेळा जेवण्यापेक्षा पाच ते सहा वेळा थो़डं थोडं खा. एकदाच पोटभरुन खाण्यापेक्षा थोडं थोडं खा.
प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे शरीरात ताकद येईल मांसपेशी मजबूत होतील.
कमी कार्बोहायड्रेट्स मात्र फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा.
साखरयुक्त पदार्थ, अधिक कॅलरी असलेलं खाणं, तसेच अल्कोहोल सेवनं करण टाळा.
लोणी, चीजसाऱख्या वस्तू खाऊ नका. तेलकट पदार्थांपासून दूर राहा. हवं तर तुम्ही पीनट बटरता वापर करु शकता मात्र त्याचे प्रमाणही कमी ठेवा.
आठ ते दहा ग्लास पाणी दररोज प्या.
जिम जाण्याऐवजी घरातच व्यायम करा. स्वत:चे रुटीन बनवा.