होळी स्पेशल : घरच्या घरी बनवा थंडाई

उद्या धुळवड म्हणजेच रंगाचा सण. या दिवशी विविध रंगाची उधळण केली जाते. होळीच्या सणानंतर वातावरणातील तापमान वाढत जाते. या वाढलेल्या तापमानात शरीरातील थंडावा कायम रहावा यासाठी थंडाई बनवली जाते. तुम्ही बाहेर अनेकदा थंडाई प्यायला असाल मात्र आता ही थंडाई तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.

Updated: Mar 12, 2017, 03:44 PM IST
होळी स्पेशल : घरच्या घरी बनवा थंडाई

मुंबई : उद्या धुळवड म्हणजेच रंगाचा सण. या दिवशी विविध रंगाची उधळण केली जाते. होळीच्या सणानंतर वातावरणातील तापमान वाढत जाते. या वाढलेल्या तापमानात शरीरातील थंडावा कायम रहावा यासाठी थंडाई बनवली जाते. तुम्ही बाहेर अनेकदा थंडाई प्यायला असाल मात्र आता ही थंडाई तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.

साहित्य - ५० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम पिस्ता
५० ग्रॅम टरबुजाच्या बिया
२५ ग्रॅम खसखस
२५ ग्रॅम बडिशेप
अर्धा चमचा काळी मिरी
२५० ग्रॅम साखर
एक चमचा वेलची पावडर
४ चमचे गुलाबपाणी
८ ते १० केशरच्या काड्या
अर्धा लीटर पाणी

कृती - सर्वात आधी बदाम, पिस्ता, टरबुजाच्या बिया, खसखस, बडिशेप आणि काळी मिरी चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.

हे मिश्रण एका वाटीत काढून घ्या. गॅस चालू करुन एका मोठ्या भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करा. पाच मिनिटानंतर मिक्सरमधील पेस्ट साखरेच्या पाण्यात टाका आणि मिश्रण सतत ढवळत राहा.

दोन- तीन मिनिटांनंतर हे मिश्रण घट्ट होऊ लागेल. त्यानंतर यात गुलाबपाणी, वेलची पावडर आणि केसरच्या काड्या टाका आणि एकजीव करा. 

गॅस बंद करुन मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण एका बाटलीत भरुन ठेवा. आणि ज्यावेळेस थंडाई बनवायची असल्यास एक ग्लास दुधात चार चमचे हे थंडाईचे मिश्रण मिसळा आणि काही आईस क्यूब टाकून सर्व्ह करा. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x