ही आहे सर्वात महागडी मिरची

मिरचीचे नाव घेताच आपल्या जिभेलाही तिखटपणा जाणवू लागतो. मात्र मिरचीची अशी एक जात आहे जी अधिक तिखट नाही मात्र त्या मिरचाची किंमत प्रचंड आहे. याची किंमत ऐकूनच तुम्हाला मिरची लागेल.

Updated: Oct 7, 2016, 11:35 AM IST
ही आहे सर्वात महागडी मिरची title=

मुंबई : मिरचीचे नाव घेताच आपल्या जिभेलाही तिखटपणा जाणवू लागतो. मात्र मिरचीची अशी एक जात आहे जी अधिक तिखट नाही मात्र त्या मिरचाची किंमत प्रचंड आहे. याची किंमत ऐकूनच तुम्हाला मिरची लागेल.

चिल्टेरिन असं या मिरचीला म्हटलं जाते. तसेच मदर ऑफ चिलीज या नावानेही ही मिरची ओळखली जाते. मटारच्या दाण्यांसारखी दिसणाऱ्या या मिरचीची किंमत प्रतिकिलो 24 लाख रुपये इतकी आहे. 

याचा स्वाद आणि तिखटपणा साल्सा आणि सॉससारखा असतो. अनेक पदार्थांमध्ये या मिरचीची पूड वापरली जाते.

या मिरचीचे उत्पादन केवळ पेरु देशात होते. त्यामुळेच याची किंमत अधिक आहे. तसेच याच्या बियाही ऑनलाईन खरेदी करण्यास अडचण येते. तसेच या बिया ऑनलाइन उपलब्ध असल्यास त्यांची किंमतही लाखोंच्या घरात असते.