मधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?

ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.  

Updated: Sep 11, 2014, 09:10 AM IST
मधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद? title=

मुंबई: ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.  

आसामची तेजपूर युनिव्हर्सिटी आणि पश्चिम बंगालच्या विश्व-भारती विद्यापीठातील संशोधकांनी मधुमेह रुग्णांसाठी नवा आशेचा किरण शोधून काढलाय. त्यांच्या मते जास्वंदाच्या काही ठराविक जातींचा नैसर्गिक अर्क मधुमेह बरा करण्यासाठी उपयुक्त आहे. 
संशोधकांनी ईशान्येकडील प्रदेशातून जास्वंदाच्या पानांचे वेगवेगळे सॅँपल गोळा केले आणि उंदरांवर मधुमेहाबाबतची टेस्ट केली गेली. मिळालेल्या निकालानुसार Sthalpadma किंवा land-lotus (जास्वंदाची एक जात) पानांपासून मिळालेलं phytochemical नं (झाडापासून मिळालेलं कंपाऊंड) इन्सूलिन लेव्हल योग्य राखली. 

शांतीनिकेतच्या विश्व भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ लाइफ सायंसच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक समिर भट्टाचार्य यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, “आम्हाला फुरेलिक अॅसिड मिळालं, ज्यात पॉलिफेनॉल्स होतं, जे की जास्वंदाच्या पानांच्या अर्कापासून काढलं गेलं. जे की मधुमेहासाठी उपचारात्मक एजंट म्हणून उपयुक्त आहे.”

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगात 346 मिलियन मधुमेहाचे रुग्ण आहेत. विकसनशील देशातील त्यातल्या 80 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. भारतामध्ये 63 लाख मधुमेहाचे रुग्ण आहेत. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळं रुग्णांचं प्रमाण वाढतंय. मेट्रो सिटीजमध्ये मधुमेहाच्या रुग्णांचं प्रमाण वाढतंय. इंटरनॅशनल डायबेटिज फेडरेशन (IDF) द्वारे केलेल्या अभ्यासात दुर्भाग्यपूर्वक 2030 पर्यंत भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 100 मिलियनचा आकडा पार करेल, असं म्हणण्यात आलंय. 26 ऑगस्टच्या बायोकेमिकल आणि बायोफिजिकल कम्युनिकेशन जर्नलमध्ये वरील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.