संधिवात वेदनांपासून लांब राहण्यासाठी नैसर्गिक उपचार

संधीवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघे दुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून तुम्हाला सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

Updated: Dec 3, 2015, 05:29 PM IST
संधिवात वेदनांपासून लांब राहण्यासाठी नैसर्गिक उपचार title=

मुंबई : संधीवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघे दुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून तुम्हाला सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

उतारवयात हाडांची झीज होणे, त्यामुळे सांधेदुखी सुरू होणे हे स्वाभाविकच असते. मात्र, धावपळीच्या युगात जीवनशैलीतील काही मोजके बदल, आहारावरील नियंत्रण आणि नियमित व्यायाम याच्या योगाने संधीवात दूर ठेवता येऊ शकतो. 

गुडघे का दुखतात?
शरीरातील हाडे आणि सांधा महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, संधीवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधा दुखीची समस्या डोके वर काढते. सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी आणि संधिबंधांनी तयार होतो. आपल्याकडे भारतात आपण गुडघ्याचा वापर जरा जास्तच करतो. मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे आदी अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे, किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघ्याची समस्या सुरु होते.

संधिवात कधी होतो?
संधिवात होण्याची अनेक कारणे आहेत. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादूर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्‍यांची, हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो.

संधिवातमुळे सांध्यातील वेदना सुरु होतात. हाडांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखी डोकेवर काढते. मात्र, यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले तर त्यावर आराम मिळतो. हे उपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. खालील नैसर्गित उपचार पद्धती तुम्हाला आराम देऊ शकतात.

व्यायामावर भर द्या
आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज आहे. तसेच व्यायामुळे संधीवात दूर होण्यास मदत होते. परिणामी आपले स्नायु अधिक बळकट होतात. तर सांधे लवचिक राहतात. व्यायामामुळे शरिरातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

गरम आणि थंड थेरपीचा उपयोग करा 
संधिवातामुळे होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी गरम आणि थंड थेरपीची मदत घ्या. संधिवातमुळे होणाऱ्या वेदनांचा यामुळे फरक दिसून येईल. आंघोळ करताना गरम पाणी घ्या. झोपण्यासाठी घोंगडी किंवा गरम पॅडचा वापर करा. त्यामुळे ऊब मिळते 

तर थंड उपचारही एक चांगली थेरपी आहे. यात बर्फाचा वापर करावा. वेदनापासून सुटका मिळण्यासाठी ही थेरपी चांगली. टॉवेलमध्ये बर्फ घेऊन त्याचा शेक घ्यावा. त्यामुळे चांगला आराम मिळतो.

अॅक्युपंक्चर पद्धत
अॅक्युपंक्चर ही थेरपी आपल्यासाठी चांगली आहे. यामध्ये आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारे पातळ सुयाने टोचने. एक प्राचीन चिनी वैद्यकीय उपचार आहे. सुज कमी करणे किंवा रक्ताभिसरण होण्यासाठी ही पद्धत अवलंबिली जाते. हे अॅक्यूपंक्चर संधिवात वेदना कमी करण्याची क्षमता आहे.  

ध्यान धारणा करा
ध्यान धारणा केल्याने तणावातून सुटका होते. तसेच विश्रांती मिळते. यातून आपण संधिवातावर नियंत्रण मिळवू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) यांच्या मते ध्यान केल्याने वेदनादायक सांधेदुखीवर आराम मिळतो. केलेल्या संशोधनातून स्पष्ट झालेय की, नैराश्य आणि संधिवातावर याचा फायदा मिळतो.

पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी
रोजच्या जीवनात आपण जे खातो त्याचा उपचारासाठीही उपयोग होऊ शकतो. लवंगा, दालचिनी, जिरे, मोहरी, धने, सुंठ, पुदिना, मनुका. सांधेदुखीवर उपचार करताना पचन सुधारणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे शरीरात 'आम्ल' निर्मिती होणार नाही.

दोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे दोन- तीन महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे.  

अॅसिड कमी करण्यासाठी
संधिवात कमी करण्यासाठी चरबी कमी करणे आवश्यक आहे. जेवणात माशांचा वापर करावा.

उपयुक्त हळद
भारतीय जेवणामध्ये सामान्यत: पिवळा मसाल्याला महत्व आहे. अर्थात हळद. संधिवात वेदना कमी करण्यासाठी हळद सक्षम आहे. त्यात एक रासायनिक क्युरक्यूमिन समाविष्टीत आहे. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.  
 
मालिश करण्यावर भर द्या

संधिवात कमी करण्यासाठी मालिश करणे कधीही चांगले. संधीवातामुळे सांधांचा भाग कडक होतो किंवा सुजतो. ही सुज कमी करण्यासाठी मालिश करणे एक चांगला उपाय आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.