जाणून घ्या, कंबर दुखीची कारणं

कंबर दुखण्याची समस्या ही आजकाल कॉमन झाल्यासारखी आहे. कंबर दुखण्याचं सर्वात मोठं कारण आहे, चुकीच्या पद्धतीने बसणे, कंबर नेहमी मागे करून खुर्चीवर बसलं पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की तु्म्ही कंबरेला ताण देऊन बसा.

Updated: Jan 20, 2016, 02:20 PM IST
जाणून घ्या, कंबर दुखीची कारणं title=

मुंबई : कंबर दुखण्याची समस्या ही आजकाल कॉमन झाल्यासारखी आहे. कंबर दुखण्याचं सर्वात मोठं कारण आहे, चुकीच्या पद्धतीने बसणे, कंबर नेहमी मागे करून खुर्चीवर बसलं पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की तु्म्ही कंबरेला ताण देऊन बसा.

कंबरेचं दुखणं नको असेल, तर कंबरेला थोडासा कर्व देऊन बसा. खुर्चीवर बसताना हे लक्षात ठेवा की, तुमच्या कंबरेचा भाग सरळ असावा, खांदे मागे असावेत आणि हिप्स खुर्चीच्या मागच्या भागाला लागून असावेत.

अनेक वेळा अपघातात मार लागल्याने कंबर दुखीचे प्रकार वाढतात. तुम्ही लक्षात ठेवा की, अनेक वेळा सकाळी उठल्यावर, किंवा खुर्चीतून अचानक उठल्यावर कंबर दुखी सुरू होते. 

जास्त काळ एकाच अवस्थेत बसणं, राहणं आपल्या शरीरासाठी योग्य नाही. मध्ये थोडासा ब्रेक घेतला पाहिजे, तुम्हाला आम्ही येथे कंबर दुखीचे कॉमन कारण सांगितली आहेत.