पिंपल्स दूर ठेवण्यासाठी एक सोप्पा उपाय...

तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जाण्याचं नाव घेत नाहीत... अशा वेळी काय कराल... तर त्यासाठीच हा सोप्पा उपाय, जो अगदी सहज शक्य आहे.

Updated: Oct 10, 2015, 08:57 AM IST
पिंपल्स दूर ठेवण्यासाठी एक सोप्पा उपाय...  title=

मुंबई : तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जाण्याचं नाव घेत नाहीत... अशा वेळी काय कराल... तर त्यासाठीच हा सोप्पा उपाय, जो अगदी सहज शक्य आहे.

हा सोप्पा उपाय म्हणजे, तुमची सवय... चेहऱ्याला वारंवार हात लावण्याची... होय, तुमच्या हातांच्या स्पर्शातून तुमच्या नकळत अनेक जंतू चेहऱ्यावर पसरत असतात. त्यामुळे, पिंपल्स वाढण्यास मदतच होते. 

अधिक वाचा - गर्भधारणेसाठी कोणती सेक्स पोझिशन योग्य?

पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी दिवसातून 4-5 वेळा तरी स्वच्छ पाण्यानं चेहरा साफ करा. अनेक जण दिवसभरात केवळ दोनदा चेहरा स्वच्छ करतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान करण्यास जंतूंना पुरेसा वेळ मिळतो. त्वचेवर घाम तसंच धूळीचा सामना करावा लागल्यास अॅक्नेची समस्या निर्माण होऊ शकते. 

अधिक वाचा - टमी कमी करण्यासाठी पाच सोप्या टिप्स!

 

 साध्या सोप्प्या उपायामुळे, तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आटोक्यात राहण्यास मदत होईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.