न्यूयॉर्क : 'सिंगल पॅरेन्टस्' ही कन्सेप्ट आता समाजात बऱ्यापैंकी रुळलीय. पण, यामध्ये एकट्या वडिलांपेक्षा एकट्या आईला अधिक आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो, असं आता स्पष्ट झालंय.
एका नव्या शोधातून ही गोष्ट समोर आलीय. आपल्या अपत्यांना एकट्यानं मोठं करणाऱ्या 'आई'ची आर्थिक स्थिती एखाद्या एकट्या पित्यापेक्षा जास्त खराब असते.
अधिक वाचा - घटस्फोट घेण्यापूर्वी हा विचार जरूर करा...
तसंच मुलांची संख्या जास्त असेल तर या 'आई'च्या समस्येच्या संख्येत आणखीन वाढ होते. मात्र, एकट्या पित्याच्या बाबतीत ही गोष्ट घडत नाही. एकट्या पित्याची मिळकत मुलांची संख्या वाढल्यानं एकतर वाढत जाते किंवा स्थिर राहते.
एखाद्या एकट्या आईची मिळकत एखाद्या एकट्या पित्यापेक्षा दोन तृतीअंश प्रमाणात असते, असं अमेरिकेतील शिकागोच्या युनिव्हर्सिटी ऑफ इल्लीनोइसमध्ये कौटुंबिक अभ्यासाचे सहाय्यक प्रोफेसर कारेन क्रॅमर यांचं म्हणणं आहे.
कारेन यांच्या म्हणण्यानुसार, २०१२ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील २८ टक्के मुलं आपल्या 'सिंगल पॅरेटस्'सोबत राहतात. त्यातील ४,०४,००० एकट्या पित्यांच्या तुलनेत ४३.४ लाख एकट्या आई गरिबीरेषेच्या खाली आयुष्य व्यतीत करतात.
अधिक वाचा - लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे!
कारेन यांच्या म्हणण्यानुसार, आपलं जीवन गरिबीरेषेच्या वरती आणण्यासाठी एकट्या-दुकट्या पालकांसाठी त्यांनी 'फूल टाईम जॉब' करणं आवश्यक असते. पण, महिला मात्र यात मागे पडतात.
घटस्फोटाच्या प्रकरणांत मुलांच्या संगोपणाची आणि आर्थिक मदतीची जबाबदारी पित्यांकडे सोपवली गेली पाहिजे, असंही कारेन यांनी म्हटलंय. हा अभ्यास 'जेंडर इश्युज'मध्ये प्रकाशित करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.