न्यूयॉर्क : लहान मुलांचा नियमित दिनक्रम मुलांच्या आरोग्यास खूप फायदेशीर असतो. एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, नियमित खेळ आणि मनोरंजन लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असते. या गोष्टी वेळेवर झाल्यास त्यांच्यातील लठ्ठपणावरही नियंत्रण राहते.
अमेरिकेच्या ओहियो स्टेट विश्वविद्यालयातील प्रमुख लेखिका सारा अॅंडरसन याच्या मते, लहान मुलांचा नियमित दिनक्रम त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो आणि त्यांना जाड होण्यापासूनही दूर ठेवतो. त्यांनी केलेल्या या संशोधनात तीन वर्षांच्या ३००० मुलांचं मूल्यांकन करण्यात आले. त्यातून हा निषर्कष काढण्यात आला आहे.
या मुल्यांकनात आई – वडिलांच्या रिपोर्टनुसार मुलांची दोन गटात तुलना करण्यात आली. त्यामध्ये आत्मनिरीक्षण आणि समान वयोगटाचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनाचे प्रकाशन ‘ओबेसिटी’ या पत्रकात करण्यात आले आहे. तीन वर्षांची मुलं भावनात्मक बंधनांसारख्या कठीण परिस्थितीतून जात असतील तर त्यांच्यामध्ये अकरा वर्षापर्यंत लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. असेही अॅंडरसन यांचे म्हणणे आहे.
तसेच वेळेवर न झोपणेही मुलांच्या लठ्ठपणाचे महत्त्वाचे कारण आहे. वेळेवर न झोपणाऱ्या मुलांमध्येही अकरा वर्षांपर्यंत लठ्ठपणा वाढतो. वेळेवर झोपणारी मुलं आरोग्यदायी आणि सुदृढ असतात. असेही त्यांनी म्हटलं आहे.