मुंबई : अनेकांच्या नखांवर पांढरे डाग असतात. शनिवारी बेसन अथवा चणे खाल्ल्यास तसेच शनिची साडेसाती असल्यास असे डाग येतात असे सांगितले जातात. आपल्याही लहानपणी आपल्याला हेच सांगण्यात आले होते.
मात्र नखांवरील पांढरे डाग असण्यामागे शनिची साडेसाती नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे पांढरे डाग नखांवर दिसतात.
तसेच नखांना इजा झाल्यास त्याचे डाग नखांवर दिसतात. अनेकदा नखांना लहानसहान इजा होत असतात ज्या आपल्याला जाणवत नाहीत. मात्र त्याचे डाग नखांवर दिसतात.
त्यामुळेच नखे मोठी होत गेल्यास नखांबरोबर हे डाग पुढेपुढे सरकतात आणि दिसेनासे होतात. तसेच अॅलर्जीमुळेही नखांवर पांढरे डाग होऊ शकतात.