मुंबई : थंडीत गरमगरम टोमॅटो सूप पिण्याची मजा अधिकच असते. ग्रिल्ड सँडविचसोबत तर टोमॅटो सूपची मजा अधिक येते. टोमॅटो सूपमध्ये कॅलरीची मात्राही कमी असते. टोमॅटोच्या सूपमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात व्हिटामिनेस ए, ई, सी आणि के तसेच अँटी ऑक्सीडेंटसही असतात. हे आहेत टोमॅटो सूप पिण्याचे सात फायदे
1. टोमॅटोमध्ये व्हिटामिन ए तसेच कॅल्शियम असते जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर असते. टोमॅटोचे सूप नियमित प्यायल्यास हाडांना मजबूती मिळते.
2. टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपरची मात्रा असते. तसेच पोटॅशियमही असते. ज्यामुळे मेंदूची ताकद वाढतो.
3. टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटामिन ए आणि सी असते. व्हिटामिन ए पेशींच्या विकासासाठी गरजेचे अशते. तसेच शरीरासाठी 16 टक्के व्हिटामिन ए आणि 20 टक्के व्हिटामिन सीची गरज असते. टोमॅटो सूप प्यायल्याने ही गरज पूर्ण होते.
4. टोमॅटो सूप ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवल्यास वजन कमी कऱण्यास फायदा होतो. यात पाणी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
5. टोमॅटोच्या सूपमध्ये लायकोपिन आणि कॅरोटोनॉईड सारखे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे महिला आणि पुरुष दोघांमध्ये कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
6. डायबिटीजचा त्रास असणाऱ्यांना टोमॅटो सूप जरुर प्यावे. यात क्रोमियम असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते.
7. टोमॅटोमधील सेलोनियम रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो. ज्यामुळे अॅनेमियाचा धोका कमी होतो.