मुंबई : आपल्या काही वाईट सवयीमुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासकांच्या मते आजची जीवनशैली खूप बदलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर प्रभाव पडत आहे. यात तुमची बेपर्वाईही कारणीभूत आहे.
खालील या कारणामुळे तुमचे पोट वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही शक्यतो टाळा.
१. जेवल्यानंतर तुम्ही सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंग घेतल्यामुळे ते अत्यंत धोकादायक असते. जर तुम्ही चुकून असा विचार करीत असाल तर जेवणानंतर सोडा पिणे आरोग्याला चांगले आहे, तर ते चुकीचे आहे. तुम्हाला चरबी वाढवायची नसेल तर सॉफ्ट ड्रिंक पिण्याची सवय सोडून द्या. पेय पदार्थात साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चरबी वाढते.
२. सतत बसून काम करणे धोकादायक आहे. जे लोक खुर्चीवर बसून काम करतात त्यांच्या पोटाचे फॅक्ट वाढतात. डेस्क जॉब करणारे लोक जाडे होतात. त्यांच्या जांघा आणि कमर मोठी होते. खासकरुन महिलांना याचा जास्त धोका होता.
३. खाण्याच्यावेळी कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवणे. जर तुम्ही योग्य आहार घेतला नाहीत. किंवा आहार घेताना तुम्ही बेफिकीर केली तर तुमचे वजन वाढते शिवाय जाडेपणाही वाढतो. तुम्हाला आवडलेले जेवण जास्त घेतले तर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पोट वाढण्यास मदत होते. त्यामुळे योग्य आहार घ्या.
४. टीव्हीसमोर बसून जेवण घेऊ नका, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असते. अनेक लोक टीव्हीसमोर बसून जेवण घेतात. टीव्हीसमोर बसून खाणे हा एक प्रकारे आजाराप्रमाणे आहे. त्यामुळे टीव्हीसमोर खाताना आपण किती खातो याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे तुम्ही लठ्ठ होण्याचा धोका अधिक असतो.
५. जंक फूड खाण्याचे टाळा. आज वेळेअभावी जंक फूड खाण्यावर भर दिला जात आहे. अनेक लोक सामान्य आहार घेत नाही. त्यामुळे जंक फूड खाल्याने आपल्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज जातात. त्यामुळे तुमचे पोट वाढण्याबरोबर तुम्ही लठ्ठ होण्यास मदत होते.