दिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे

बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.

Updated: May 17, 2017, 07:42 PM IST
दिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे title=

मुंबई : बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.

बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यातील चांगले फॅट, प्रोटीन तसेच फायबरमुळे शरीराला फायदा होतो. 

बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. यामुळेच परीक्षेच्या काळात अथवा शाळेत जाणाऱ्या मुलांना बदाम दिले जातात. 

बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन ई असते. जे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 

बदामाच्या सेवनाने हृदयरोगाचा धोका कमी होतो.