किसमिसपेक्षा अधिक फायदेशीर त्याचे पाणी, जाणून घ्या पाच फायदे

किसमिसचे पाणी हे नुसत्या किसमिसपेक्षा अधिक फायदेशीर असते.

Updated: Jan 6, 2016, 08:53 PM IST
 किसमिसपेक्षा अधिक फायदेशीर त्याचे पाणी, जाणून घ्या पाच फायदे  title=

मुंबई :  किसमिसचे पाणी हे नुसत्या किसमिसपेक्षा अधिक फायदेशीर असते. त्याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. तसेच दररोजच्या आरोग्यासंदर्भातील कुरूबुरीही दूर होण्यास मदत होते. 

किसमिसच्या पाण्याचे अनेक फायदे 
किसमिस म्हणजे सुखामेवा हा द्राक्ष सुखवून तयार केला जातो. सुखल्यानंतरही त्यात द्राक्षाचे सर्व गुण कायम राहतात. यात आर्यन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्निशियम आणि फायबर असते. याच्या सेवनाने शरीरातील रस, रक्त, शुक्र इतर धातू तसेच ओजची मात्रा वाढते. 

इतकेही गुण याच्या पाण्यात असतात, नियमित सेवनाने अनेक आजार बरे होतात. तसेच दररोजच्या आरोग्यासंदर्भातील कुरूबुरीही दूर होण्यास मदत होते. 

१) कसा कराल वापर 
किसमिसचे पाणी बनविण्यासाठी एक भांड्यात थोडे पाणी घ्या. त्यात किसमिसचे आठ-दहा नग टाका. त्यानंतर त्याला २० मिनिटे उकळवा. त्यानंतर या पाण्याला रात्रभर एका ग्लासमध्ये ठेवा. त्यानंतर सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी पिऊन घ्या. 

२) बद्धकोष्ट आणि अॅसिडिटी 
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनियमित खाणे त्यामुळे पोटांचे आजार सर्वांना असतात. अनहेल्दी आणि जंक फूडच्या सेवनाने बद्धकोष्ट आणि अॅसिडिटीसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. तुम्ही जर याचे शिकार झाले आहात, तर रोज किसमिसचे पाणी प्या. रोज हे पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुधारते आणि शरिरातील उर्जा वाढते. 

३) कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करतो
किसमिसचे पाण्याचे सेवन रोज केल्याने कोलेस्ट्रॉलचे स्तर कमी होण्यास मदत होते. लोकांमध्ये अनियमित खाण्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यात लठ्ठपणा तसेत हृदयाच्या समस्या होण्याच्या शक्यता आहे. किसमिसचे पाणी प्यायल्याने ट्रायग्लिसेराइड्सचा स्तर कमी होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

४) सुरकुत्या कमी होतात
तणाव आणि रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. यामुळे कमी वयात तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. तुम्ही रोज किसमिसचे पाण्याचे सेवन केल्यास या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच पडलेल्या सुरकत्या नष्ट होतात. तुम्ही पुन्हा तरूण दिसू लागतात. 

५) आजारांना दूर ठेवतो
तुम्हांला ताप येत असेल तर किसमिसच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. यातील फिनॉलिक पायथोन्यूवट्रियंट जे जर्मीसाइडल अॅन्टी बायोटिक आणि अॅन्टी ऑक्सीसडेंट तत्व असतात. त्यामुळे ताप छुमंतर होऊन जातो. तसेच तुम्हांला फिट ठेवतो.