वाढते वजन देते आजाराला निमंत्रण

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घ्यायलाही आपल्याकडे पुरेपुर वेळ नसतो. तासन् तास एकाचं जागेवर बसून काम करणे, अनियमित जेवणाच्या वेळा, झोपेचा अभाव, पिझ्झा, बर्गर, यांसारख्या फास्ट फूडच्या सवयीमुळे वजन वाढण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

Updated: Oct 28, 2013, 06:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घ्यायलाही आपल्याकडे पुरेपुर वेळ नसतो. तासन् तास एकाचं जागेवर बसून काम करणे, अनियमित जेवणाच्या वेळा, झोपेचा अभाव, पिझ्झा, बर्गर, यांसारख्या फास्ट फूडच्या सवयीमुळे वजन वाढण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक या माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती आपल्यासाठी काही नवीन नाही. या जाहिराती प्रभावीरित्या वजन कमी करण्याचा वचन देतात. चिकित्साशास्त्राने अशा प्रकारच्या दाव्यांवर शंका उपस्थित केली आहे.
नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचे काही कार्यक्रम वगळता बाकीचे कार्यक्रम पूर्णपणे कुचकामी ठरतात. असे कँसर विभाग आणि बी.एल.कपूर हॉस्पिटलचे बॅरिएट्रीक शस्त्रक्रिया संचालक दीप गोयल यांनी सांगितले.
ज्या देशात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. त्या देशात हृदय रोग, मूत्रपिंड समस्या, उच्च रक्तदाब, मधुमेह इतकचं काय तर कर्करोगासारख्या रोगांना आमंत्रण दिलं जातं. तिथे वजन कमी करण्याचे कार्यक्रम केवळ आकर्षित करण्याचे काम करतात.
पण सत्य हे आहे की, बहुतांशी जाहिराती चुकीच्या संकल्पनांना जन्म देतात. मॅक्स संस्थेचे मिनिमल एक्सेसचे वरिष्ठ सल्लागार सुमित शाह यांच्याशी सहमत आहेत. जोपर्यंत पोषक तज्ज्ञांच्या देखरेखमध्ये वैज्ञानिक रितीने व्यायाम केला जाणार नाही, तोपर्यंत चांगले परिणाम मिळू शकत नाही.
अत्यंत गंभीर प्रकरणात जेव्हा शरीरावरील चरबी ४० टक्क्यांपेक्षा जास्त दर्शविली जाते, तेव्हा शस्त्रक्रियेची गरज असते, असं शाह यांनी सांगितले. डब्ल्यूएचओच्या मते कर्करोग टाळता येतो अशी चार कारणे आहेत. त्या पैकी लठ्ठपणा त्यातील एक आहे. वजन किंवा लठ्ठपणा वाढल्याच्या कारणांनी प्रत्येक वर्षी जगभरात २८ लाख लोक मरण पावतात. हा आरोग्यासाठी एक गंभीर विषय आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.