१ रूपये किलो तांदळामुळे लोक दारूच्या आहारी-शंकराचार्य

पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी छत्तीसगढ सरकारच्या एका रुपयात तांदूळ योजनेचा समाचार घेतला.

Updated: Mar 4, 2014, 09:59 PM IST

१ रूपये किलो तादुळामुळे लोक दारूच्या आहारी-शंकराचार्य
पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी छत्तीसगढ सरकारच्या एका रुपयात तांदूळ योजनेचा समाचार घेतला.
एक रुपयात तांदूळ दिल्याने मजूरी महागली, विकास ठप्प झाला आणि लोक दारूच्या आहारी गेली अशा शब्दांत पुरी पिठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी टीका केली आहे.
शंकराचार्यांनी छत्तीसगढमधील आमदार धनेंद्र साहू यांच्या अभनपूर गावात उपस्थितांशी संवाद साधला. शंकराचार्य म्हणाले, राजकीय पक्ष विविध मुद्द्यांवर निवडणुका लढवतात. मात्र सत्तेवर येताच त्यांना या मुद्द्यांचा विसर पडतो. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर निवडणूक लढवताना राजकीय पक्षांनी त्या मुद्द्यावर सखोर विचारविनिमय करायला हवा.
विशेषतः काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे शंकराचार्यांनी नमूद केले. राजकारणामुळे देशाची पिछेहाट राजकारण व राजकीय नेतृत्वावर शंकराचार्यांनी जोरदार टीका केली.
जगावर प्रभाव पाडण्याची क्षमता भारतात आहे. मात्र दुर्दैवाने देशाच्या नेतृत्वात ती क्षमता नाही असे शंकराचार्य यांनी सांगितले. राम मंदिर, सीमा सुरक्षा, गरिबी हटाव आणि नदी - समुद्र जोडण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर येतात.पण निवडणूकीनंतर आश्वासनाचा विसर पडतो असा टोला त्यांनी लगावला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.