ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी!

ऑक्टोबर महिन्यात तुमची बँकांची कामं तुम्हाला अगोदरपासूनच प्लान करावी लागणार आहेत. कारण, या महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी असेल.

Updated: Sep 30, 2016, 08:06 PM IST
ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी!  title=

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात तुमची बँकांची कामं तुम्हाला अगोदरपासूनच प्लान करावी लागणार आहेत. कारण, या महिन्यात तब्बल ११ दिवस बँकांना सुट्टी असेल.

दसरा, मोहरम, दिवाळी यांसहीत या महिन्यात वेगवेगळ्या कारणांमुळे बँकां तब्बल ११ दिवस बंद असतील. 

तसंच ८, ९, ११, १२ ऑक्टोबर आणि ३०, ३१ ऑक्टोबरला जोडून सुट्ट्याही मिळणार आहेत.

कोणकोणत्या दिवशी बँका राहतील बंद...

- ऑक्टोबर महिन्यातले पाच रविवार (२, ९, १६, २३, ३० ऑक्टोबर)

- दुसरा आणि चौथा शनिवार  (८, २२ ऑक्टोबर)

- २ ऑक्टोबर : गांधी जयंती

- ११ ऑक्टोबर : दसरा

- १२ ऑक्टोबर : मोहरम

- ३० ऑक्टोबर : लक्ष्मीपूजन

- ३१ ऑक्टोबर : बलिप्रतिपदा