www.24taas.com, झी मीडिया, मंडी/हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात मंडी इथं व्यास नदीत बोट बुडून आंध्र प्रदेशातील 24 विद्यार्थी बुडालेत. सर्च ऑपरेशनमध्ये पाच विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. आजही उरलेल्या 19 जणांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे.
याप्रकरणी हायकोर्टानं प्रकरणाची सज्ञान दखल घेत मुख्य सचिवांकडून उत्तर मागवलं. तर दुसरीकडे निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. हिमाचलमधील मंडी जिल्ह्यामध्ये लारजी नावाचं धरण आहे. या धरणाच्या सांडव्याजवळ आंध्रप्रदेशातून आलेल्या हैदराबादच्या विज्ञान ज्योती इन्सिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी संस्थेच्या विद्यार्थ्यांची सहलीची बस थांबली होती. विद्यार्थी फोटो काढत होते आणि त्याचवेळी धरणातून अचानक सोडल्यानं 24 विद्यार्थी वाहून गेले होते.
बेपत्ता 24 विद्यार्थ्यांमध्ये 18 मुलं आणि 6 मुलींचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी हैदराबादच्या एका इंजिनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळं ही दुर्घटना घडलीय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळंच ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय.
दरम्यान या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी दिले आहेत. तर लारजी धरणावरच्या विभागीय अभियंत्याचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच हिमाचल प्रदेश हायकोर्टानं 16 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
बेपत्ता विद्यार्थ्यांची नावं
1. अकुल्ला विजेथा
2. आशिष मंथा
3. बैरिनेनी हृत्विक
4. बनोथू रामबाबू
5. दसरी श्रीनिधी
6. देवाशिष बोस
7. गंपला ऐश्वर्या
8. बास्वराज संदीप
9. गोनूर अरविंद कुमार
10. कल्लुरी श्री हर्षा
11. करसता रिशिता रेड्डी
12. लक्ष्मी गायत्री अप्पाबोलता
13. एम. शिवा प्रकाश वर्मा
14. एम. विष्णू वर्धन रेड्डी
15. मर्चर्ला अखिल
16. मित्तापल्ली अखिल
17. मुप्पिडी किरण कुमार
18. नेरुडु जगदिश मुदिराज
19. पी. व्यंकटा दुर्गा पुरुन
20. मोहम्मद साबिर हुसेन शेख
21. पी. रिदिमा
22. बी. महेन साई राज
23. टी. उपेंदर
24. च. परमेश्वर
25. प्रल्हाद- टूर ऑपरेटर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.