दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील २० गाड्या रद्द

उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तर भारतामधील बहुतेक भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या भागामधून जाणाऱ्या किमान 135 रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत, तर २० गाड्या पूर्णत: रद्द आहेत.

Updated: Jan 24, 2016, 02:07 PM IST
दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील २० गाड्या रद्द title=

नवी दिल्ली : उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तर भारतामधील बहुतेक भागांमध्ये दाट धुक्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या भागामधून जाणाऱ्या किमान 135 रेल्वेगाड्या नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा धावत आहेत, तर २० गाड्या पूर्णत: रद्द आहेत.

सेवा सुरळित करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये जम्मु मेल, उत्तरांचल संपर्क क्रांती एक्‍सप्रेस आणि भागलपूर गरीबरथ या गाड्यांचा समावेश आहे. 

दिल्लीमधील किमान तापमान शनिवारी 4.6 अंश सेल्सियसवर होते. दरम्यान, आधी रद्द करण्यात आलेल्या वा उशिरा धवत असलेल्या किमान 68 रेल्वेगाड्यांची सेवा सोमवारपासून सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.