शहडोल : मध्य प्रदेशात एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ४५ वर्षीय महिलेने आपल्याला झालेले अपत्य हे १४ वर्षीय मुलाकडून झाला असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील शहडोल तालुक्यातील गोहपारू गावातील ही घटना आहे.
आदिवासी महिलेच्या आरोपांनंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाने या महिलेच सर्व आरोप फेटाळले आहे. ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक छळ करीत असल्याचे नववीत शिकणाऱ्या या मुलाने पोलिसांना सांगितले.
गेल्या काही महिन्यापासून महिला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होती. आपण या महिलेला ओळखत असलो तरी तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले नाही. महिला गरोदर कशी राहिली याबाबत आपल्याला माहित नसल्याचंही या मुलाने पोलिसांनी सांगितले.
महिला आपली बदनामी करीत आहे. प्रकरण पंचायतीत गेले पण काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे प्रकरण पोलिसांमध्ये गेले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.