पोस्टमार्टम करताना तो झाला जिवंत!

मृत समजून त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला घेऊन गेले, आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणाहून तो जिंवत बाहेर आहे. पण जीवनाच्या आशाने ज्या रुग्णालयात पुन्हा भरती झाला त्या ठिकाणी तो जीवन-मरणाची झुंज हरला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 15, 2014, 06:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धनबाद
मृत समजून त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला घेऊन गेले, आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणाहून तो जिंवत बाहेर आहे. पण जीवनाच्या आशाने ज्या रुग्णालयात पुन्हा भरती झाला त्या ठिकाणी तो जीवन-मरणाची झुंज हरला.
धनबाद येथील पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला मृत समजून पोस्टमार्टमला पाठवले. पण पोस्टमार्टम करण्यापूर्वी तो जिवंत झाला आणि इलाज सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्याचे शव आता ओळखीसाठी शवगारात ठेवण्यात आले आहे.
धनबाद येथील मुख्य पोस्ट ऑफीसजवळ सोमवारी पोलिसांना बेशुद्ध अवस्थेत एक ६० वर्षीय वृद्ध दिसला. पोलिसांनी त्याला मृत मानत पंचनामा करून शव पोस्टमार्टमला पाठवले. पण पोस्टमार्टम करताना वृद्धाच्या शरीरात हालचाली सुरू झाल्या. यानंतर खळबळ माजली. तडकाफडकी पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वृद्धाला नवे कपडे, फळं आणि औषध विकत घेऊन देण्यात आली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जास्त आजारी असलेल्या वृद्धाचे मंगळवारी दहा वाजता निधन झाले. थंडी अधिक असल्याने वृद्धाचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.