पीएफवर ८.५ टक्के व्याज?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 9, 2013, 12:08 PM IST

www.24taas, झी मीडिया,नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफओ) ८.५ टक्के व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हा व्याजदर २०१३-१४ या वर्षासाठी असेल. याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर व्याजदराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन पीएफची माहिती आणि पीएफ ट्रान्सफर करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर गतवर्षी आर्थिक वर्षात प्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याजदर देण्यात आला होता. पाच कोटींहून अधिक नोकरदारांना त्याचा लाभ मिळणार आहे. २०१२-१३ मध्ये पीएफवर साडेआठ टक्के, तर २०११-१२ मध्ये ८.२५ टक्के व्याजदर देण्यात आलेला होता.
याआधी पीएफवर ८.७५ टक्के व्याजदर देण्याचा विचार सुरू होता. मात्र, फंडाकडे तूट निर्माण झाली असती. परिणामी, अर्थ मंत्रालयाकडून त्यास परवानगी मिळण्याची शक्यता कमी होती, त्यामुळे हा निर्णय मागे पडला. आता ८.५ टक्के व्याजदर देण्याबाबत २३ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.