अमृतसर : भारत आणि पाकिस्तानचे लष्कर दररोज वाघा बॉर्डरवर सायंकाळी आयोजित रिट्रीटींग सेरेमनीत सामील होतात. हा समारोह पाहण्यासाठी दोन्ही देशातील नागरिक मोठ्या संख्येने हजर राहतात. पण गुरूवारी पाकिस्तानकडून एक वेगळे चित्र पाहायला मिळाले.
A Sikh Pakistani Ranger AJ Singh today took part in the daily drill at Wagah Border. pic.twitter.com/o9lLU3Whko
— ANI (@ANI_news) January 7, 2016
पाकिस्तानकडून पहिल्यांदा या रिट्रीटींग सोहळ्यात पहिल्यांदा शिख पाकिस्तानी सैनिक पाहायला मिळाला. या वेळी उपस्थित असलेल्यांसाठी ही एक सामन्य घटना नव्हती. सामान्यतः पाकिस्तानी रेंजर्सकडून सेरमनीत सामील होणारे मुस्लिम सैंनिक असतात.
पाकिस्तानी लष्करात हिंदू किंवा शिख सैनिकांची संख्या खूपच कमी आहे.