अडवाणींना राजीनामा द्यावासा वाटतोय, एका खासदाराचा दावा

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्याच सरकारवर आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 15, 2016, 10:21 PM IST
अडवाणींना राजीनामा द्यावासा वाटतोय, एका खासदाराचा दावा

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्याच सरकारवर आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे. संसदेतला गोंधळ बघून राजीनामा द्यावासा वाटतोय, अशा शब्दांत त्यांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रिस अली यांनी केलाय. 

मात्र यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये ब्लेमगेम सुरू झालाय. आपल्याच पक्षामध्ये लोकशाही मुल्यांसाठी अडवाणींना झगडा करावा लागत असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणालेत. तर विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्यामुळेच अडवाणी संतापल्याचा दावा केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे.