बंगळुरूत अभाविप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण

बंगळुरू : शुक्रवारी बंगळुरू शहरात उच्च माध्यमिक बोर्डाच्या कार्यालयाबाहेर रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ अभाविप कार्यकर्त्यांनी  आंदोलन केलं. आंदोलनकर्ते विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते. 

Updated: Apr 1, 2016, 04:48 PM IST
बंगळुरूत अभाविप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण  title=

बंगळुरू : शुक्रवारी बंगळुरू शहरात उच्च माध्यमिक बोर्डाच्या कार्यालयाबाहेर रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ अभाविप कार्यकर्त्यांनी  आंदोलन केलं. आंदोलनकर्ते विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते. 

मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवलं. त्यामुळं संतप्त आंदोलनकर्ते पोलिसांना भिडले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळं पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळं बिथरलेल्या आंदोलकांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. 

१२वीचा रसायनशास्त्राचा पेपर १० दिवसांत दोनदा फुटल्याने राज्यसरकारने बोर्डाच्या ४० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे दोनदा परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. पेपरफुटीचा हा वाद सध्या कर्नाटकाच्या विधानसभेचे वातावरणही तापवतो आहे.