सैनिकाचे पार्थिव आणण्यासाठी पैसे नव्हते, ते मित्रांनी जमविले

हवाई दलातील दिवंगत सैनिक महेश चंद्र वाजपेयी २ डिसेंबर रोजी डेंग्यूमूळे मृत्यू झाला. मात्र, या जवानाचा पार्थिव घरी आणण्यासाठी घरच्यांकडे पैसे नव्हते. त्यांच्या मदतीला महेश यांचे मित्र धावलेत. या मित्रांनी पैसे गोळा करून मदत केली.

Updated: Dec 5, 2015, 05:22 PM IST
सैनिकाचे पार्थिव आणण्यासाठी पैसे नव्हते, ते मित्रांनी जमविले title=

कानपूर : हवाई दलातील दिवंगत सैनिक महेश चंद्र वाजपेयी २ डिसेंबर रोजी डेंग्यूमूळे मृत्यू झाला. मात्र, या जवानाचा पार्थिव घरी आणण्यासाठी घरच्यांकडे पैसे नव्हते. त्यांच्या मदतीला महेश यांचे मित्र धावलेत. या मित्रांनी पैसे गोळा करून मदत केली.
 
घाटमपूरमधील पसेमा गावात राहणारा महेश हे हवाई दलातील सैनिक दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी आले होते. मात्र, त्यांना डेंग्यू झालेला असताना नोकरीवर रुजू व्हावे लागले. २७ नोव्हेंबरला महेशची प्रकृती जास्तच खालाऊ लागली. त्यांच्या पत्नीने हवाई दलाच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. २ डिसेंबरला महेश यांचे निधन झाले.

नातेवाईकांनी जेव्हा या जवानाच्या पार्थिव घरी घेऊन जाण्याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता. त्यांनी हात आखडते घेतले. शिवाय सल्ला दिला की तुम्ही येथेच अंत्यसंस्कार करा. परंतु नातेवाईकांनी यास विरोध केला. पार्थिव विमानाने घरी कसा आणणार या विचारत कुटुंबीय होते. त्याचवेळी महेश यांच्या मित्रांना ही बातमी समजली त्यांनी तात्काळ पैसे गोळा केले आणि कुटुंबीयांकडे दिले. त्यानंतर त्यांचा पार्थिव घरी आणण्यात आला.

महेश यांच्यावर कुटुंबाचा भार होता. त्यांच्या घरची परस्थिती खूप नाजूक आहे. त्यांना कोमल नावाची एक मुलगी आहे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.