ईव्हीएम वादावर निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक

ईव्हीएममध्ये टॅम्परिंगबाबत सुरु असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपलं मत मांडणार आहेत.

Updated: May 12, 2017, 08:56 AM IST
ईव्हीएम वादावर निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक title=

नवी दिल्ली : ईव्हीएममध्ये टॅम्परिंगबाबत सुरु असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपलं मत मांडणार आहेत.

राजकीय पक्ष बॅलेट पेपरने मतदानाची सध्या मागणी करत आहेत. ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा मुद्दा लावून धरणाऱ्या आम आदमी पक्षातर्फे पक्षाचे प्रतिनिधित्व आमदार सौरभ भारद्वाज करणार आहेत.

ईव्हीएममध्ये आरओएमच्या मदतीने टॅम्परिंग केल्याचा आरोप आपने केला होता. आपने निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे की, आयोगाने सर्व पक्षाचे प्रतिनिधी आणि आयोगातील तज्ज्ञ यांची एक कमिटी तयार करावी. पक्ष कमिटीसमोर ईव्हीएम टॅम्परिंग सिद्ध करु शकते.