आपण राजनच्या रुपाने विचारवंत गमावतोय-सेन

नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दुसरी टर्म करण्यास नकार दिल्याने, त्यांचा हा निर्णय भारतासाठी दुःखद आहे. त्यांच्या रुपाने आपण एक हुशार विचारवंत गमावत आहोत.

Updated: Jun 19, 2016, 10:54 PM IST
आपण राजनच्या रुपाने विचारवंत गमावतोय-सेन

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दुसरी टर्म करण्यास नकार दिल्याने, त्यांचा हा निर्णय भारतासाठी दुःखद आहे. त्यांच्या रुपाने आपण एक हुशार विचारवंत गमावत आहोत.

राजन यांच्या या निर्णयावर बोलताना सेन यांनी त्यांची स्तुती केली आहे. तर, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राजन यांच्या या निर्णयाला सरकारला जबाबदार धरले आहे. राजन यांच्या निर्णयाने उद्योग जगतातही निराशेचे वातावरण आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना राजन यांच्यासारख्या तज्त्रांची गरज नसल्याचे म्हटले आहे.

अत्यंत हुशार आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे ज्ञान असलेल्या राजन यांना आपण गमावत आहोत. भारतासाठी आणि सरकारसाठी हे दुःखद आहे. रिझर्व्ह बँक ही पूर्णपणे स्वायत्त संस्था नाही. त्यामुळे याचा फटका भारताला बसणार आहे, असं अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.

रघुराम राजन यांनी केंद्रीय बॅंकेचे प्रमुख या नात्याने दुसरी टर्म  करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, की ४ सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून, आपण पुन्हा शिक्षणक्षेत्रात परतणार आहोत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x