'हार पे चर्चा'करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक

बिहारमधल्या दारूण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावण्यात आलीय. पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दुपारनंतर ही बैठक होणार आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यताय.

Updated: Nov 9, 2015, 09:19 AM IST
'हार पे चर्चा'करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक title=

नवी दिल्ली: बिहारमधल्या दारूण पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक बोलावण्यात आलीय. पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दुपारनंतर ही बैठक होणार आहे. यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पत्रकार परिषदही घेण्याची शक्यताय.

आणखी वाचा - ही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...

बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेस महाआघाडीनं भाजपचा दारूण पराभव केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संसदीय बोर्डाच्या बैठकीत नितीश कुमार आणि महाआघाडीविरोधात भाजपनं चांगलं प्रदर्शन केलं नाही. त्यामुळं या विषयावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - बिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे

यादरम्यान, पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांनी सांगितलं की, निवडणूक निकालांचं विश्लेषण आणि आत्मचिंतन पक्षाचं नेतृत्व करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.