आसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज

लैंगिक शोषणच्या आरोपात अटक झालेले आसाराम बापू यांनना जोधपूरमध्ये एकदम व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. आसाराम यांच्यावर आश्रमातील १५ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका बातमीत म्हटले आहे की, आसाराम यांना जेलमध्ये कोणतीच अडचण नाही. जेलमध्ये ते देखील ऐशो-आरामात राहत आहेत. 

Updated: Sep 4, 2015, 03:23 PM IST
आसाराम जेलमध्ये करतात रोज फूल बॉडी मसाज title=

जयपूर : लैंगिक शोषणच्या आरोपात अटक झालेले आसाराम बापू यांनना जोधपूरमध्ये एकदम व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. आसाराम यांच्यावर आश्रमातील १५ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका बातमीत म्हटले आहे की, आसाराम यांना जेलमध्ये कोणतीच अडचण नाही. जेलमध्ये ते देखील ऐशो-आरामात राहत आहेत. 

आसाराम संदर्भात एक बातमी समोर आली, त्यानुसार एक मंत्री जे नुकतेच सेंट्रल जेलमधून सुटले. ते जेलमध्ये आसाराम बापू यांच्या सोबत होते. त्यांनी सांगितले आसाराम बापू यांना जेलमध्ये सर्वप्रकारच्या सुविधा मिळथ आहेत. जेल प्रशासन त्याच्या रोजच्या गरजांची संपूर्ण काळजी घेत आहे. या बातमीत संबंधी मंत्री कोण आहे हे देण्यात आले नाही. 

जेलमध्ये मंत्री आसारामला अनेक वेळा भेटले आहेत. त्याच्या जवळच्या बॅरेकमध्ये आसाराम यांना ठेवण्यात आले आहे. नेत्याने दावा केला की आसाराम खूप मऊ गादीवर झोपतात. त्यांचे कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये जातात. आसाराम यांना आपल्या बॅरेकच्या बाहेर फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. पण हिंसक प्रवृत्तीच्या कैद्यांजवळ जाण्यास मनाई आहे. 

आसाराम बापू दररोज ३० ते ४० मिनिटे फूल बॉडी मसाज घेतात. त्यांच्या कामासाठी पाच सेवादार आहेत. प्रत्येक दिवशी एक जण हे काम करतो. या सेवादारांनना त्यांच्या सेवेसाठी घेण्यात आले आहे. आसाराम यांचा एक सेवादार एका मशीनच्या मदतीने एक विशेष पदार्थ आसाराम यांच्या डोक्यावर टाकतात. ही ट्रिटमेंट ३० ते ४० मिनिटे चालते. त्यानंतर आसाराम अंघोळीला जातात. त्यानंतर आसाराम काजू-बदाम, फळं आणि ज्यूस घेतात. हे दररोज दिले जाते. त्यानंतर आसाराम दुपारी आराम करतात. 

आसाराम सुरक्षेप्रती खूप जास्त सजग आहेत. पाच सेवादार २४ तास त्यांच्या सेवेत लागलेले असता. बॅरकबाहेर फिरताना त्यांच्या आसपास घेरा बनवून फिरतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.