बंगळुरूत १०० रुपये शोधण्यासाठी १२ मुलींचे कपडे उतरविले

 १०० रूपये शोधण्यासाठी एका शाळेत मुख्याध्यापिकेने १२ विद्यार्थींनीचे कपडे उतरवून त्याची झडती घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे. 

Updated: Sep 4, 2015, 02:40 PM IST
 बंगळुरूत १०० रुपये शोधण्यासाठी १२ मुलींचे कपडे उतरविले title=

बंगळुरू :  १०० रूपये शोधण्यासाठी एका शाळेत मुख्याध्यापिकेने १२ विद्यार्थींनीचे कपडे उतरवून त्याची झडती घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहे. 

हे प्रकरण मंड्या जिल्ह्यातील एका शाळेत घडले. या शाळेत १०० रुपये हरविल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर गोंधळाची परिस्थिती झाली. 

यावेळी क्लासमध्ये २९ विद्यार्थी उपस्थित होते. त्यातील एका विद्यार्थीनीने १०० रुपये हरविल्यामुळे आरडओरडा करायला सुरूवात केली. त्यानंतर तीने आपल्या मैत्रिणींना पैसे देण्यास सांगितले. मैत्रिणींनी उत्तर दिले नाही म्हणून मुख्याध्यापिका जयालक्ष्मम्मा या ठिकाणी पोहचल्या. 

बेंगळुरू मिररने दिलेल्या बातमीनुसार मुख्याध्यापिकेने सर्व विद्यार्थ्यांना विचारले पण कोणी १०० रुपये घेतल्याचा इन्कार केला. त्यानंतर त्यांनी क्लासमधील खिडकी दरवाजे बंद केले आमि सर्व मुलींना कपडे उतरविण्यास सांगितले. 

मुख्याध्यापिकांच्या या प्रकाराचा विद्यार्थीनीनी विरोध केला. पण मुख्याध्यापिका म्हणाल्या, या ठिकाणी सर्व मुली आहेत, त्यामुळे तुम्हांला कपडे उतरविण्यास काहीच हरकत नाही. कपडे उतरविले पण १०० रूपये काही सापडले नाही. मग सर्व मुलींना घरी पाठवले. 

या मुलींनी घरी जाऊन आपल्या पालकांना प्रकार सांगितले. पालकांनी या प्रकरणी विरोध दर्शविला. त्यानंतर बुधवारी मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.