पसरतायेत दंगल धमक्यांच्या अफवा

आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता धमक्यांची अफवा पसरू लागली आहे. कर्नाटकात राहणाऱ्या ईशान्येतील लोकांवर हल्ले होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

Updated: Aug 16, 2012, 11:47 AM IST

www.24taas.com, बंगळुरू
आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता धमक्यांची अफवा पसरू लागली आहे. कर्नाटकात राहणाऱ्या ईशान्येतील लोकांवर हल्ले होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. हल्ल्याच्या भीतीने कर्नाटकात गेल्या अनेक वर्षांपासून राहणारे ईशान्येकडील विद्यार्थी, नोकरदार शहर सोडून पुन्हा आसामच्या दिशेने जावू लागले आहेत.
आसामकडे जाणाऱ्या मिळेल त्या ट्रेनने अनेकजण जागा पकडू लागले आहेत. मात्र, हल्ल्याची ही केवळ अफवा असल्याचं कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आलं आहे.लोकांनी कर्नाटक सोडून जाऊ नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून ईशान्येकडील लोकांना पुरेसं संरक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत.