शिक्षणमंत्र्यांना स्वत:च्या भविष्याची चिंता

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या शिक्षणावरून वादात आल्यानंतर आणखी त्या चर्चेत आल्या आहेत. कारण शिक्षणमंत्रीच ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्या होत्या. तसेच स्मृती इराणी राष्ट्रपती बनतील, अशी भविष्यवाणी राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांनी केली आहे.

Updated: Nov 24, 2014, 03:02 PM IST
शिक्षणमंत्र्यांना स्वत:च्या भविष्याची चिंता title=

नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या शिक्षणावरून वादात आल्यानंतर आणखी त्या चर्चेत आल्या आहेत. कारण शिक्षणमंत्रीच ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्या होत्या. तसेच स्मृती इराणी राष्ट्रपती बनतील, अशी भविष्यवाणी राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या मुलांच्या भविष्य घडवण्याची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे दिली, पण स्मृती इराणी यांनी ज्योतिषाकडे जाऊन आपल्या स्वत:च्या भविष्याची काळजी केली, ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या भेटीत व्यास यांनी पाटीवर काही संदेश लिहून त्यांचं आगामी काळातील भविष्य वर्तवल्याचं समजतं. स्मृती इराणी तब्बल चार तास ज्योतिषाच्या घरी ठाण मांडून बसल्या होत्या. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांच भविष्य सुधारण्याची जबाबदारी असलेल्या इराणी यांनी स्वतःच एका ज्योतिषासमोर हात पसरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आता ज्योतिषाकडे भविष्यवाणी विचारल्यामुळे स्मृती इराणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी वादात आहे. इतकंच काय तर स्मृती इराणी आणि वाद हे जणू काही समीकरणच तयार झालं आहे. 
 
मंत्रिमहोदय थेट ज्योतिषाच्या घरी गेल्या
ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्या घरी जाऊन स्मृती इराणी यांनी आपल्या भविष्याबाबत विचारणा केली. इराणी या आधीही ज्योतिष व्यास यांच्याकडे गेल्या आहेत. त्यावेळी इराणींना राजकारणात मोठं पद मिळेल, असं भाकित ज्योतिषी नथ्थूलाल व्यास यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे व्यास यांनी केलेल्या भाकितामुळे इराणींना केंद्रात मनुष्यबळविकास मंत्रालयाची जबाबदारी मिळाली होती.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.