www.24taas.com, नवी दिल्ली
टीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्याचं सध्या दिसतंय.
केजरीवाल यांनी राजकीय मार्गाचा पर्याय स्वीकारलाय, तर कोणताही पक्ष स्थापणार नाही, अशी भूमिका अण्णांनी घेतलीय. या पार्श्वभूमीवर दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर अण्णा आणि बाबा रामदेव यांच्यात गुप्त चर्चाही झाली होती.
विरोधकांबरोबरच योगगुरु बाबा रामदेव यांनीही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय. घोटाळ्यांमुळेच देशावर आर्थिक संकट आल्याची टीका त्यांनी केलीय. ‘पंतप्रधान अर्थतज्ज्ञ नव्हे तर अनर्थतज्ज्ञ’ असल्याची टीकाही बाबा रामदेवांनी केली. 2 ऑक्टोबरपासून देशातल्या 650 जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.