अमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा!

जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.  

Updated: Jan 14, 2016, 02:28 PM IST
अमेरिकेने जबरदस्तीनं घेतला भारतीय दाम्पत्याच्या बाळाचा ताबा! title=

जयपूर : अमेरिका आणि भारत यांच्यात आता एका बाळाच्या ताब्यावरुन वाद होईल की काय अशी चिन्ह आहेत. त्याला कारणही तसेच आहे.



मूळचे जयपूरचे असणारे पण गेले काही महिने अमेरिकेत न्यू जर्सीत राहणारे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीस (TCS)मध्ये काम करणारे पारिक दाम्पत्य या वादाचे कारण ठरू शकतात.



पारिक दाम्पत्याला ऑक्टोबर महिन्यात बाळ झालं. गेल्या महिन्यात बाळाला घरात घेऊन फिरत असताना छोटा अभिषेक त्याच्या आईच्या हातातून अचानक निसटला आणि त्याचं डोकं टीव्हीवर आदळलं.  



पारिक त्वरीत बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. बाळाला जबर मार बसला होता. डॉक्टरांनी त्यावर उपचार केले. परंतु, पालकांनी बाळाची योग्य ती काळजी न घेतल्याचं सांगत त्यांना बाळाचा ताबा देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर या बाळाचा ताबा एका संगोपन केंद्राकडे दिला.



पारिक कुटुंबीयांच्या मते हा केवळ अपघात होता. पण, अमेरिकी प्रशासन मात्र हे मानायला तयार नाही. त्यांच्यामते हे बालशोषण आहे. यासंदर्भात पारिक यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना एक पत्र लिहून मदत मागितली आहे.



उल्लेखनीय म्हणजे, अशाच एका वादामुळे २०१२ मध्ये भारत आणि नॉर्वे यांचे संबंध ताणले गेले होते.