बँकांची `एटीएम`सह, सर्व्हिस चार्ज वाढवण्याची तयारी

बँकांनी एटीएम ट्रांझॅक्शन फी वाढवली नसली, तरी दुसऱ्या सेवांसाठी चार्जेस वाढवायची तयारी काही बँकांनी सुरू केली आहे.

Updated: Mar 11, 2014, 12:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बँकांनी एटीएम ट्रांझॅक्शन फी वाढवली नसली, तरी दुसऱ्या सेवांसाठी चार्जेस वाढवायची तयारी काही बँकांनी सुरू केली आहे.
तुम्हाला एटीएमचा डुप्लिकेट पिन किंवा डिमांड ड्रॉफ्ट बनवायचा असेल, तरी अधिक पैसे मोजण्याची गरज आहे.
बँकांनी देऊ केलेल्या एसएमएस सेवेवरही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
अॅक्सिस बँक, धनलक्ष्मी बँक, आणि सिटी युनियन बँक आपल्या सर्व्हिस चार्जमध्ये १ एप्रिलपासून बदल करतील, असं म्हटलं जातंय.
मात्र अजून एटीएम ट्रांझॅक्शनवर कोणताही निर्णय झालेला नाही, ही फी वाढवायची किंवा नाही यावर अजून निर्णय झालेला नाही.
रिझर्व्ह बँकेच्या समितीने एटीएम चार्जेस वाढवण्याविषयी बँकांकडून १५ दिवसांच्या आत प्रस्ताव मागितला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.