www.24taas.com,अलाहाबाद
अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरील फुट ओव्हर ब्रिज तुटला नसल्याचा दावा रेल्वेमंत्री पवनकुमार बंन्सल यांनी केलाय. फुटओव्हर ब्रिजची रेलिंगसुद्धा तुटली नसल्याचं रेल्वेमंत्र्याचा दावा आहे. स्टेशनवरील चेंगराचेंगरी तुफान गर्दीमुळं झाल्याचा दावा त्यांनी केलाय.
अलाहाबादमध्ये कुंभमेळा भरलेला असून रविवारी शाही स्नान असल्यानं कोट्यवधी भाविक गंगेत डुबकी मारण्यासाठी अलाहाबादेत जमले होते. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म नंबर सहावरचा फूटओव्हर ब्रीजचा कठडा तुटल्यानं ही दुर्घटना घडली.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीचे आदेशही त्यांनी दिलेत. तसंच रेल्वेमंत्र्यांनी दुर्घटनेसाठी तात्काळ हेल्पलाईन सुरु करण्याचेही आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देत पीडितांना मदतीची घोषणा केलीय.
दरम्यान या घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. प्लॅटफॉर्म नंबर६ वरचा कठडा कोसळल्यानं हा चेंगराचेंगरी होऊन हा अपघात घडल्याचं बोललं जातंय.. त्यामुळं या घटनेला रेल्वे जबाबदार असल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी हे आरोप फेटाळलेत.