जयपूर : फास्ट फूडसाठी प्रसिद्ध कंपनी मॅकडॉनल्डच्या पदार्थांबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या एका चौकशीत हे समोर आलं की, मॅकडॉनल्ड कंपनी फूड बनवण्यासाठी 16 दिवसापर्यंत ते तेल वापरतात.
जयपूरच्या आरोग्य विभागाने 17 जूनला केलेल्या एका निरीक्षणात हे समोर आलं आहे की, मॅकडॉनल्डमध्ये वापरण्यात येणारं तेल हे 16 दिवस जूनं होतं. रिपोर्टनुसार या तेलाला रोज 16 दिवसांपर्यंत रोज 360 डिग्री तापमानावर गरम केलं जातं. यामुळे याचा रंग काळा होतो.
आरोग्य विभागातील तज्ञ्ज यावर म्हणतात की, पुन्हा-पुन्हा एकच तेल गरम केल्यानंतर त्यातील न्यूट्रीशन नाहीसं होऊऩ जातं. यानंतर त्यामधून तयार केलेले फूड प्रोडक्ट्स हे हृदयरोग आणि ब्रिस्ट कँसर सारख्या आजारांना आमंत्रण देतात. निरीक्षणात समोर आलं की, काही मॅकडॉनल्डच्या आउटलेटजवळ तर तेलचा वापर किती असावा यावर नियंत्रण आणणारी प्रणाली देखील नाही आहे. यानंतर केएफसी आणि सबवे यासारख्या फूड कंपनी मधील फूड देखील तपासून पाहण्याची गरज आहे. मॅकडॉनल्डने मात्र सगळे आरोप फेटाळले आहेत.