50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश

बलात्कार पीडित महिलेला आरोपीकडून 50 हजार रुपये घेऊन पोटात वाढणाऱ्या गर्भाला पाडण्याचा धक्कादायक आदेश जातपंचायतीकडून मिळालाय. बिहारच्या किशनगंज जिह्याताली बाहदूरगंज भागात ही घटना उघडकीस आलीय.

Updated: Dec 4, 2014, 04:19 PM IST
50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश title=
प्रातिनिधिक फोटो

किशनगंज : बलात्कार पीडित महिलेला आरोपीकडून 50 हजार रुपये घेऊन पोटात वाढणाऱ्या गर्भाला पाडण्याचा धक्कादायक आदेश जातपंचायतीकडून मिळालाय. बिहारच्या किशनगंज जिह्याताली बाहदूरगंज भागात ही घटना उघडकीस आलीय.

या भागात राहणाऱ्या आणि इयत्ता दहावीत शिकणारी ही मुलगी बलात्काराची शिकार ठरली होती. यावर तिनं पंचायतीकडे न्याय मागितला. तर पंचायतीनं तिच्या पोटातील गर्भाची किंमत 50 हजार रुपयांवर निश्चित केली. त्यामुळे, धक्का बसलेल्या या युवतीनं पंचायतीकडून न्यायाची अपेक्षा सोडून आता पोलिसांकडे धाव घेतलीय. पीडित मुलीचे वडील राजस्थानमध्ये नोकरी करतात तर आणि शेतात मजूर म्हणून राबते.  

संबंधित बलात्कार पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे. घरात एकटी असलेली पाहून गावातील रियाज आणि त्याच्या तीन भावांनी घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर, रियाजनं तिच्यावर बलात्कार केला. यामुळे, जबरदस्त मानसिक धक्का बसलेल्या पीडितेनं घाबरून याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. पण, ती गर्भवती राहिल्यानंतर मात्र तिनं आपल्या आईला या घटनेबद्दल माहिती दिली. 

त्यानंतर, याप्रकरणावर गावात पंचायत बोलावण्यात आली. यावेळी आरोपीनं पैशांचं प्रलोभन दाखवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. पंचायतीनंही पीडितेला 50 हजार रुपये घेऊन गर्भपात करण्याचा निर्णय सुनावला. त्यानंतर, मात्र पीडितेनं आईसोबत पोलीसांकडे धाव घेतली.

किशनगंज जिल्ह्याच्या महिला ठाणेच्या प्रभारी श्वेता कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या जबाबाच्या आधारावर महिला ठाण्यात याबद्दलची तक्रार नोंदवून घेण्यात आलीय. एफआयआरमध्ये मोहम्मद रियाज, गुल मोहम्मद, मुन्ना आणि महिनाज आलम या आरोपींच्या नावांचा समावेश आहे. यातील सर्वच आरोपी फरार झालेत. पुढचा तपास सुरू आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.