पाटना : बिहारची तथाकथित 'टॉपर' रुबी रॉय हिला अटक करण्यात आलीय.
बिहारच्या टॉपर घोटाळ्यात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलीय. पोलिसांनी रुबीला बोर्ड ऑफिसमधून अटक केलीय. ती बोर्ड ऑफिसमध्ये रिव्ह्यू टेस्ट देण्यासाठी आली होती.
कोर्टानं आज चार विद्यार्थ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय. यानंतरच, रुबीला बोर्ड ऑफिसमध्येच अटक होऊ शकते, हे पक्कं झालं होतं.
रुबी ही बिहार इंटर आर्टसची टॉपर आहे. बोर्डानं यापूर्वीही तिला रिव्ह्यू टेस्टसाठी बोलावलं होतं... परंतु, ती तेव्हा आलीच नव्हती.
पाटणा पोलिसांनी या प्रकरणात बोर्डाचे माजी अध्यक्षांच्या 'पीए'लाही अटक केली होती. इतर टॉपर्सच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.
पॉलिटिकल सायन्सला रुबीनं 'प्रोडिकल सायन्स' म्हटलं होतं... या विषयात जेवण बनवणं शिकवलं जातं असंही तिनं म्हटलं होतं.